Sunday, 29 October 2017

भा. रा. तांबे

मधुघट!

आधुनिक मराठीतील गीतकाव्य या साहित्य प्रकाराचे प्रवर्तक असे ज्यांचे उचीत वर्णन केले जाते, त्या राजकवी भास्कर रामचंद्र उर्फ भा. रा. तांबे यांचा आज १४३ वा जन्मदिन.

शब्द व गेयता यांचे निसर्गदत्त लेणे लाभलेल्या तांबेंनी बालगीते, प्रणयगीते, निसर्गगीते, विराणी अशा गीतकाव्याच्या सर्वच क्षेत्रांत मुक्त मुशाफिरी केली व आपल्या शब्दप्रतिभेचा कायमचा ठसा मराठी मनावर उमटवला.

तांबेंचा जन्म व सारी हयात महाराष्ट्राबाहेर हिंदीभाषी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी गेली. त्यांचे शिक्षणही अलाहाबाद येथे झाले. पण १९ व्या शतकात उत्तरेत अनेक मराठी भाषक संस्थाने होती. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला. ते ग्वाल्हेर संस्थानचे 'राजकवी' बनले.

झांशीच्या राणी लक्ष्मीबाई या तांबेंच्या आत्या. ते वीररक्त तांबेंच्या धमन्यांमधून वाहात होते. त्यांनी विरश्रीयुक्त कविता लिहिली:

हे हिंद बांधवा थांब या स्थळी
दोन अश्रू ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मालवे
इथे झाँसीवाली ।।

'हे दूध तुझ्या त्या घटातले', 'डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका', या सारख्या त्यांच्या कवितांनी प्रणयरस फुलवला, तर 'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा'त  भावा-बहिणीचे प्रेम दाखवले.

वार्धक्य, मृत्यू व वियोग या संज्ञांबद्दल तांबेंना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात.

कळा ज्या लागल्या जीवा
मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे
कुणाला काय सांगाव्या

अशा त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा!

कशी काळनागिणी
सखी गं वैरिण झाली नदी
प्राण विसावा पैलतीरावर
अफाट वाहे मधी

ही तांबेंची विरह कविता अंतर्मुख व्हायला लावणारी आहे.

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या', 'मावळत्या दिनकरा' 'जन पळभर म्हणतील हाय हाय', अशा कवितांतून त्यांना त्यांच्या अखेराची स्पष्ट जाणीव झाल्याचे जाणवते.

मृत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.

तांबे १९४१ साली गेले. त्याच्या थोडाच काळ आधी त्यांना एका दिवाळी अंकात कविता लिहिण्याविषयी विनंतीचे पत्र आले. त्यावेळेस उत्तरादाखल त्यांनी कविताच पाठवली. ती बहुधा त्यांची अखेरचीच कविता असावी, असे म्हटले जाते.

तीच ही 'मधुघट' कविता :

मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सख्या, दया करीं.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगीं अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचें मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचें नांव का सया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

Monday, 25 September 2017

कवी भूषण

A Shakti Upasaka Of Jagadamba Bhavani
.
इन्द्र जिमि जंभ पर , वाडव सुअंभ पर ।
रावन सदंभ पर , रघुकुल राज है ॥१॥
पौन बरिबाह पर , संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर , राम व्दि‍जराज है ॥२॥
दावा द्रुमदंड पर , चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुण्ड पर , जैसे मृगराज है ॥३॥
तेजतम अंस पर , कान्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेच्छ बंस पर , शेर शिवराज है ॥४॥

भावार्थ - जिस प्रकार जंभासुर पर इंद्र, समुद्र पर बड़वानल, रावण के दंभ पर रघुकुल राज, बादलों पर पवन, रति के पति अर्थात कामदेव पर शंभु, सहस्त्रबाहु पर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, पेड़ो के तनों पर दावानल, हिरणों के झुंड पर चीता, हाथी पर शेर, अंधेरे पर प्रकाश की एक किरण, कंस पर कृष्ण भारी हैं उसी प्रकार म्लेच्छ वंश पर शिवाजी शेर के समान हैं।
.

प्रेतिनी पिसाच अरु निसाचर निशाचरहू,
मिलि मिलि आपुस में गावत बधाई हैं ।
भैरो भूत-प्रेत भूरि भूधर भयंकर से,
जुत्थ जुत्थ जोगिनी जमात जुरि आई हैं ॥
किलकि किलकि के कुतूहल करति कलि,
डिम-डिम डमरू दिगम्बर बजाई हैं ।
सिवा पूछें सिव सों समाज आजु कहाँ चली,
काहु पै सिवा नरेस भृकुटी चढ़ाई हैं ॥

भावार्थ – प्रेतनी, पिशाच, निशाचर मिलजुल कर बधाई गा रहे हैं। अत्यंत भयंकर भूत-प्रेत, भैरव और जोगिनियों की जमातें एकत्रित हो गई हैं। काली और दिगंबर ढमरू बजाकर हंस रहे हैं। यह देखकर पार्वती जी ने शिव जी से पूछा कि यह सब आपका समाज आज कहां जा रहा है, तो शिवजी ने कहा कि ऐसा लगता है कि राजा शिवाजी किसी पर नाराज़ हो गये हैं और इस कारण युध्द और नरसंहार की आशा में यह सभी उसी ओर जा रहे हैं।

- कवि भूषण (Original Poet)
Source: Aalok Shukla

Tuesday, 12 September 2017

Subhasit

न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् |
यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम् |
(- महाभारत)


God is not one who will walk behind guiding you like cows with a stick. But God gives intelligence (to solve problems by oneself) to one whom god wishes to protect.


Monday, 20 February 2017

माझा दगड माझा देव.....

शाळेत चौथीच्या वर्गावर बाई म्हणाल्या, "आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.
एका मुलाने निबंध लिहिला...!!

विषय :-     *दगड*

'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो.

अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.

हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.

स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो.

मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.

रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.

शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छन्निचे घाव सहन करतो.

शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.

बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.

सतत आपल्या मदतीला धावून येतो, "देवा'सारखा.

मला सांगा, " 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ?"

बाई म्हणतात, "तू 'दगड' आहेस . तुला गणित येत नाही.
आई म्हणते, "काही हरकत नाही, तू माझा लाडका 'दगड' आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."

आई म्हणते , "दगडाला शेंदुर फासून त्यात भाव ठेवला की, त्याचा 'देव' होतो."

म्हणजे, 'दगड'च 'देव' असतो.

त्या निबंधाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, हे सांगणे नको.
🌹☘🍁👏👍🏻🍁☘🌹

वेडात मराठे वीर दौडले सात...

वेडात मराठे वीर दौडले सात अर्थात्- Seven Stupid (?) Maratha Warriors

रविवारची गाफील सकाळ:

ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सुरू झालं. सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली " बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना"
मी " हूं...help? आईला विचार.. आई छान सांगेल"
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आतून एक खरमरीत आणि निर्वाणीचा ईशारा आला " तो पेपर बाजूला ठेव आणि ती काय सांगतेय ते नीट ऐक".

मग मी योग्य तो निर्णय घेतला...म्हणजे पेपर बाजूला ठेवला.
"काय यार एवढ्या लहान मुलांना लिहून देणार? CBSC वाले पण YZ आहेत. एकदा पंजाब history,  एकदा गुजराथ history....... आणि ते पण पोरांनीच करायचं कधी project तर कधी हे असलं Elocution.... कोणाच्या बापानी शिकवलीय अशी history?"

हो.... यात जरा त्रागा जास्त झाला पण मघाशी मी पेपर बाजूला ठेवला ही काही माझी माघार नव्हती हेही मला कुठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं.

सोनाली शांतपणे, "हो ना? मग तू शिकव ना तिला एखादी गोष्ट तुला हवी तशी....पिलू आपलं आहे आपणच त्याला घडवायचं... " (दरम्यान संगणकावर वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सूरू होतं)  "आता हे गाणं बघ.. सांग याची एक गोष्ट   तिला समजेल तशी..ती सांगेल शाळेत. शिवचरित्राची पारायणं केली आहेस म्हणतोस तर बघूयाच  तू कशी शिकवतोस ही history तिला".

आपल्याला असं clean bold करण्याचे हुकमी कसब बायकोच काय ती जाणे. पण गोष्ट मात्र खरी होती, मलाही पटली होती. आता मात्र वेडात दौडलेल्या सात मराठ्यांची गोष्ट चिन्मयीला शिकवायचीच असं ठरवून टाकलं.

फिरंगी भाषेच्या वेढ्यात: की वेडात

सुरूवात लगेचच केली. आधी चिन्मयीला घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर मंगेशकरांनी बसवलेलं गाणं परत ऐकवलं. तिलाही आवडलं. मग सुरूवात तिला गोष्ट समजावून सांगायची.
"ही ना सात खूप शूर मराठा सरदारांची आहे, ते रागाच्या भरात चाळीस हजार शत्रू सैन्यावर चालून गेले."
चिन्मयी " बाबा चाळीस हजार म्हणजे? "
मी "Forty thousand"
आता मात्र चिन्मयी अवाक्...
" but why baba? How can they be so stupid? मरणार नाहीत का ते?"

नकळत काटा टोचावा तसा तिचा "Stupid" हा शब्द मला टचकन् टोचला. कुसूमाग्रजांनीही त्यांना "वेडात" दौडले असंच म्हटलं होतं. पण ते "वेड" आणि या "Stupidity" यातला फरक मला खूप कासावीस करत होता. तिला चाळीस हजार म्हणजे forty thousand सांगणं मी समजून घेऊ शकत होतो पण तिच्या सात मराठ्यांचा आवेश न समजण्यानं मी इतका अस्वस्थ का होतो? कुठली तरी मनोमन जपलेली मौल्यवान् वस्तू हरवल्यावर वाटतं तसं वाटायला लागलं. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या माझ्या पिलापर्यंत काही गोष्टी माझ्या मराठीतून पोचणारच नव्हत्या. "इतक्या उपरी बदफैली केलीया मारले जाल" या शब्दातली जरब तिला कधीच जाणवणार नव्हती.
"आधी लगीन कोंडाण्याचं" या शब्दातला रांगडा निर्धार तिला कळणार न्हवता. "लाख जावोत पण लाखांचा पोशिंदा राहो" म्हटल्यावर तिला दोन हातात दांडपट्टा घेतलेला बाजीप्रभू दिसणार नव्हता. निव्वळ इतिहास रंजनापलिकडे जाऊन या गोष्टी आम्हाला काही मूल्य शिकवून गेल्या. आणि त्या मूल्यांसाठी म्ृत्युच्य  दाढेत प्राण वैरून बसणारी ही माणसं हा आमचा वारसा होता. आज मात्र हा अनुवंशिक ठेवा मी पुढे देऊ शकत नाहीये असं वाटलं. रहाणीमान फक्त भाषेच्या विळख्यात नव्हतं, तर वेढा होता त्या भाषेबरोबर आलेल्या पाश्चात्य संस्कारांचा.

फिरंगी भाषेतला "एल्गार":

मग विचार  केला की जे आपल्याला कळलं आणि भावलं ते चिन्मयीला कळेल असं म्हणजे इंग्रजीतच का सांगू नये?
थोडं वाचन सूरू केलं. इंग्रजांच्या इतिहासातही अशा एका बेदरकार साहसाची नोंद आहे. क्रेमियाच्या युद्धात असेच सहाशे इंग्रज सैनीक शत्रू सैन्याच्या महासागरावर चालून गेले होते. लाँर्ड टेनीसन नावाच्या कुण्या गोर्यानं त्यांची शौर्यगाथा " March of light brigade" नावाच्या कवितेत व्यक्त केली आहे. (wiki वर अवश्य वाचा). तो म्हणतो " Into the valley of death rode the six hundred". हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांसारखच होतं. फरक इतकाच की ते सहाशे होते आणी आमचे फक्त सातच होते. मग तर या सातांची गोष्ट इंग्रजीत सांगायलाच हवी. शिवाय भारतातील बर्‍याच बिगर मराठी लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये.
लाँर्ड टेनीसनच्या भाषेचा प्रभाव होताच. आता कुसूमाग्रजांची मनोमन माफी मागून लिहायला बसलो. पहाता पहाता Seven maratha warriors इंग्रजीत अवतरले.

With the blazing swords those
             rose out of their sheathers
Oh they were so fearless
             Seven maratha warriors

They saw their commander bit sombre
             But his eyes were red with anger
They saddled the  horses
            with javelins that were longer
With the whirls of dust
              they disappeared into frontiers
Oh they were so fearless
               Seven maratha warriors

Leaving behind their
              dumbfounded army
Vengeance to concur
              same treacherous enemy
They took on the battle
              in enemy yard so gallantly
Like seven fireballs
               Blew away enemy barriers
Oh they were so fearless
                Seven maratha warriors

Their bravery leaves the
             Trail till the horizon
The wind is humming
              Songs of the martyrdom
A tribute to them for
               for selfless heroism
We salute them,
              Those braveheart warriors
Oh they were so fearless
              Seven maratha warriors

समर्पण

चिन्मयीला आता Seven Maratha Warriors जरा चांगले समजले आणि आवडले आहेत. तिच्या Elocution मध्ये तिनं त्यांची शौर्यगाथा इंग्रजी कवितेसह न अडखळता सांगीतली. त्यामुळे आम्ही तिघं जरा खूष आहोत.

पण या अंतरिक्षात आमच्या सारखे कुणी आई बाप अडखळले, तडफडले किंवा कासावीस झाले असतील तर त्यांच्या पर्यंत हा अनुभव पोचावा अशा इच्छेपोटी हा   प्रपंच करीत आहे.
इदं न मम असं म्हणून.
जय शिवराय...🚩

Sunday, 29 January 2017

ग्रामसभा

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन
१   मे                       - कामगार दिन
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.

संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.

प्रत्येक  ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.

जर आपल्या ठरावाची नोंद इतीव्रूत्तात नसेल तर आपन ग्रामसभेचे विडिओ रिकोर्डिंग मागवुन तपासु शकतो.

सशक्त नागरीक सशक्त गाव .

👆👆लोकशाही मध्ये
वाघासारखे जगा..

अतिशय महत्वाची माहिती आहे प्रत्येकाला कळालीच पाहिजे.

Saturday, 21 January 2017

हजार तासांची घरातली शाळा.....

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
  टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर आज सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत लेख प्रसिद्ध झाला आहे....................... 
                   हजार तासांची घरातली शाळा.....                                                                                 ___________________________
                   शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा  १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या  शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या  अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
                     १००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे  काळजीने बघत नाहीत.
                         याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या  दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.  
                           तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी. 
टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट  किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती  आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे  वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
                        आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
                     ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये  
                   संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त  संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते 
            यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
                  राजीव दीक्षित म्हणायचे की   राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही
                     

                               टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल  आतापर्यंत  महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध  माध्यमातून  या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार  विद्यार्थी, पालक यांना  वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या  आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे  फोन नंबर ९४२०७८७१७३    

                     २० सोनेरी वर्ष
महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.

              भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).

वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.

रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.

‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
  ( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)                                       
(महेश गोरडे 9420787173)
   -----------------------------------------                                             लेखन ///        हेरंब कुलकर्णी फोन ९२७०९४७९७१
ईमेल herambkulkarni1971@gmail.com